मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे ही संस्था 1 जून 1893 रोजी स्थापन झाली. शतकोत्तर परंपरा लाभलेल्या या संस्थेचे, मराठी ग्रंथांचे, भाषेचे संवर्धन व जतन करणे हे प्रमुख उद्दिष्ट व ध्येय आहे. अशा या संस्थेच्या दोन नवीन इमारती,सुभाष पथ येथे पाच मजली,तर नौपाडा येथे चार मजली बांधून पूर्ण झाल्या आहेत.

उक्त वास्तूंचे उदघाटन विद्यावाचस्पति श्री. शंकर अभ्यंकर यांच्या शुभ हस्ते शनिवार दि. 2 जानेवारी 2010 रोजी संपन्न झाले. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. श्री. शंकर वैद्य या प्रसंगी अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.

 
  • 116 वर्षांची परंपरा असलेली सामाजाभिमुख कार्यात सातत्याने कार्यरत असलेली ठाण्यातील एकमेव संस्था
  • महाराष्ट्रातील आद्य ग्रंथसंग्रहालय
  • ठाणे जिल्हा अ वर्ग मुक्तद्वार वाचनालय म्हणून महाराष्ट्र शासनाकडून मान्यता
  • जिल्ह्यातील उत्कृष्ट वाचनालय म्हणून शासनाकडून डॉ. आंबेडकर पुसस्कार प्रदान
  • संस्था सार्वजनिक विश्वस्त संस्था म्हणून धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत
  • दरवर्षी संस्थेच्या प्रशस्त सभागृहात पंधराचे आसपास विविध विषयावर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
  • वाचनालयात बसून वर्तमानपत्रे, नियतकालिके, पुस्तके वाचण्याची मोफत सोय
  • कथा-कादंब-यांपासून अध्यात्म-कोशापर्यत विविध विषयांवर 1 लाख 15 हजारांवर संख्या
  • मागणी असलेल्या पुस्तकांच्या जादा प्रती
  • समाजाभिमुख सांस्कृतिक कलोत्तेजक कार्य करणा-या संस्थाना संस्थेचे सुसज्ज सभागृह उपलब्ध.
 
ठाण्याचे मराठी ग्रंथ संग्रहालय इतिहास
सन 1887-88 च्या काळातला एक प्रसंग. मॅट्रिकच्या वर्गात असलेल्या एका सोळा सतरा वर्षाच्या मुलाला इतिहासाचं पुस्तक हवं होतं. तसं त्यानं आपल्या वडिलांना सांगितलेही. ते वकील असले तरी स्वभावाने कंजूष व चिकट होते. ते आपल्या मुलाला म्हणाले – “हे बघ, तू … दुस-या कुणाकडून तरी पुस्तक घेऊन काम भागव.”मुलगा काही ऐकेना.तेव्हा ते त्याला म्हणाले “तू पुस्तक विकत घेतल्याशिवाय पास झालास तर उत्तमच. मग पुस्तकाची आवश्यकताच राहणार नाही. समजा तू नापासच झालास तर तुझ्या आजच्या मित्रांपैकी कुणाचं तरी पुस्तक पुढच्या वर्षी तुला सहज मिळेल. तेव्हा आज तरी पुस्तक विकत घेण्याची तुला मुळीच गरज नाही.”मॅट्रीकच्या वर्गात इतिहासाच्या पुस्तकाला महाग झालेला मुलगा पुढील काळात महाराष्ट्रातला विख्यात इतिहास संशोधक तर झालाच पण पुस्तकाविषयीचा आपला लहानपणचा अनुभव पक्का स्मरणात ठेवूनही याचं मुलानं वयाच्या बावीसाव्या वर्षी 1 जून 1893 रोजी ठाण्यात मराठी ग्रंथ
संग्रहालयाची स्थापना केली. याच मुलाला यथाकाळ सर्वजण महाराष्ट्र सारस्वतकार विनायक लक्ष्मण भावे म्हणून ओळखू लागले.
अधिक वाचा
 
सन २०१८-२०१९ वार्षिक अहवाल