साहित्यिक पुरस्कार

१) डॉ. वा. अ. रेगे पुरस्कार:- संस्थेच्या वतीने डॉ वा अ रेगे साहित्य पुरस्कार देण्यात येतात या पुरस्कारांचे हे २४ वर्ष आहे ललित आणि ललितेतर अशा दोन भागात हे पुरस्कार देण्यात येतात या पुरस्कारांची मर्यादा ही ठाणे जिल्ह्यातील साहित्यिकांपुरतीच मर्यादित आहे

२) राज्यस्तरीय पुरस्कार:- संस्थेच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवाच्या निमित्ताने खालील विभागांसाठी राज्यस्तरीय साहित्यिक पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
१) कथा
२) कादंबरी
३) कविता
४) चरित्र/ आत्मचरित्र
५) अनुवाद
६) विज्ञान/पर्यावरणावरील लेखन आणि
७) बालसाहित्य अशा सात साहित्यप्रकारांतील साहित्यकृतींना पारितोषिके देऊन त्या साहित्यकृतीचा व साहित्यिकांचा सन्मान करावा अशी भूमिका आहे.

 

राज्यस्तरीय श्रीस्थानक साहित्य पुरस्कार २०२४

मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे या संस्थेच्या वतीने साहित्य पुरस्कारांच्या दोन योजना जाहीर केल्या आहेत. मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे या शतकोत्तर रौप्य महोत्सवी संस्थेच्या वतीने सन २०१७ - १८ पासून 'राज्यस्तरीय श्रीस्थानक साहित्य पुरस्कार' सुरू करण्यात आले आहेत. हे पुरस्कार दरवर्षी देण्यात येणार आहेत. यात पुढील साहित्य प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे.

१. चरित्र - आत्मचरित्र, २. कादंबरी, ३. कथा, ४. कविता, ५. विनोद, ६. अनुवाद, ७. प्रवास ,८. बाल साहित्य, ९. इतिहास, १०. विज्ञान, ११. पर्यावरण १२.समिक्षा- संशोधन, १३. नाटक व १४.निबंध / संकीर्ण

नियम :-
१) साहित्य एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर २०२४ या कॅलेंडर वर्षांत प्रकाशित झालेले असावे.

२) प्रत्येकी दोन प्रती पाठवणे आवश्यक.

३) लेखक वा प्रकाशक या प्रती पाठवू शकतात.

४) सोबत लेखक वा प्रकाशक यांचा पत्ता व संपर्क क्रमांक स्वतंत्रपणे जोडलेला असावा.

५) पुरस्कारांचे स्वरूप रोख रु. पाच हजार आणि प्रमाणपत्र असे राहील.

६) पाठविण्याची अंतिम मुदत २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत आहे.

७) पुरस्कारांचा निकाल पुरस्कारप्राप्त लेखक / प्रकाशक यांना पत्र व दूरध्वनीवरून कळविण्यात येईल.

८) तसेच निकाल वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात येईल.

९) परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. सहभागी झालेले साहित्य परत केले जाणार नाही.

भ्रमणध्वनी- ९७६८२५७५७५ / ८७७९६९६७९६

 

वा. अ. रेगे वाड्‌मय पुरस्कार २०२४
(फक्त ठाणे जिल्ह्यासाठी)


मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे या संस्थेच्या वतीने सन 1999 पासून दरवर्षी वा. अ. रेगे वाड्‌मय पुरस्कार देण्यात येतात. हे या पुरस्काराचे २६ वर्ष आहे.
१) १ जानेवारी २०२४, ते ३१ डिसेंबर २०२४, या कालावधीत प्रकाशित झालेल्या साहित्यासाठी हे पुरस्कार आहेत.
२) ललित व ललितेतर अशा दोन विभागात हे पुरस्कार देण्यात येतात.
३) हे पुरस्कार फक्‍त ठाणे जिल्ह्यासाठी आहेत.
४) या पुरस्कारासाठी प्रत्येकी ३ प्रती पाठविणे आवश्यक आहेत.
५) पुरस्काराचे स्वरुप रोख रु. पाच हजार व प्रमाणपत्र असे राहील. ललित व ललितेतर या दोन्ही विभागांना स्वतंत्रपणे पुरस्कार देण्यात येतील.
६) पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठविण्याची अंतिम तारीख २८ फेब्रुवारी २०२५ आहे.
७) अनुवादीत साहित्याचा पुरस्कारासाठी विचार करण्यात येणार नाही.
८) स्वत:चे नाव, पत्ता, संपर्कासाठी दूरध्वनी / भ्रमणध्वनी, फोटो व परिचय ही माहिती स्वतंत्रपणे सोबत जोडावी. तसेच वा. अ. रेगे वाड्‌मय पुरस्कारासाठी असा स्पष्ट उल्लेख करावा.
९) पुरस्कारासाठी विहित नामुन्यातील अर्ज सादर करावा लागेल सदरच्या अर्जाचा नमुना मराठी ग्रंथ संग्रहालयात उपलब्ध आहे.
१०) निकाल जाहीर झाल्यानंतर तो विजेत्यांना त्यांच्या संपर्क पत्त्यावर व दूरध्वनी/भ्रमणध्वनीवर कळविण्यात येईल.
११) तीन प्रतींपैकी दोन प्रती दि.१, जून २०२५, नंतर तीन महिन्याच्या आत संबंधितांनी मराठी ग्रंथ संग्रहालयातून परत स्वखर्चाने घेऊन जाव्यात. अन्यथा तीन महिन्यानंतर त्या ग्रंथ संग्रहालयाच्या नोंद वहीत नोंद होतील. त्यांचा कुठलाही मोबदला दिला जाणार नाही.

साहित्य पाठविण्याचा पत्ता:-

मराठी ग्रंथ संग्रहालय, सरस्वती मंदिर, सुभाष पथ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे (प),

संपर्क क्रमांक:- .भ्रमणध्वनी- ९७६८२५७५७५ / ८७७९६९६७९६

Top