अभ्यासिका
मराठी ग्रंथ संग्रहालयाने 'अभ्यासिका ' हा स्वतंत्र विभाग सुरू केलेला आहे.
आसन व्यवस्था : अभ्यासिकेत बसून अभ्यास करण्यासाठीची व्यवस्था प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र राहील, याची काळजी घेतलेली आहे.
वेळ : अभ्यासिकेची वेळ सकाळी आठ ते सायंकाळी आठ अशी असते . विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आणि स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक पाहून यात वाढीव स्वरूपात बदल करण्यात येतो.
शुल्क : अभ्यासिकेत प्रवेश घेण्यासाठी शुल्क आकारण्यात येते. दैनिक, आठवडा आणि मासिक असे त्याचे स्वरूप आहे.
कागदपत्रे : प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी आधार कार्ड, पॅन कार्ड आणि फोटो देणे आवश्यक आहे.
पुस्तके : विद्यार्थ्यांनी अभ्यासिकेत बसून अभ्यास करण्यासाठी स्वतःची पुस्तके वापरणे अपेक्षित आहे. ग्रंथालयामार्फत पुस्तके उपलब्ध करून देण्यात येत नाहीत.
प्रवेश मर्यादा : अभ्यासिकेत कॉलेज विद्यार्थी आणि राज्य केंद्र / स्पर्धा परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो.
क्षमता : अभ्यासिकेत एकावेळी शंभर विद्यार्थी बसू शकतील इतके क्षमता आहे.
अभ्यासिका सरस्वती मंदिर येथे पाचव्या मजल्यावर आहे.
संदर्भ विभाग
मराठी ग्रंथ संग्रहालयाकडे संदर्भ विभाग हा स्वतंत्र विभाग आहे. यात दुर्मिळ ग्रंथ, नियतकालिके आणि विविध विषयांवरील ग्रंथांचा समावेश आहे. संदर्भ विभागातील साहित्य वाचण्यासाठी/ अभ्यासण्यासाठी संदर्भ विभागातच उपलब्ध करून देण्यात येतात. हे साहित्य घरी देण्यात येत नाही. यासाठी नाममात्र शुल्क आकारण्यात येते. संस्थेच्या सरस्वती मंदिर या इमारतीत पाचव्या मजल्यावर वातानुकूलित असे सुसज्ज संदर्भ दालन आहे.
अभ्यासिकेचे शुल्क
एका दिवसाचे : रु. १००/-
साप्ताहिक : रु. ४००/-
एका महिन्याचे : रु. १०००/- (१ तारखेपासून ३० तारखेपर्यंत महिना)