डिजिटल अभ्यासिका
डिजिटल अभ्यासिका ग्रंथालयाच्या दोन्ही शाखांमध्ये डिजिटल अभ्यासिका सुरू केली आहे. महाराष्ट्र सरकारने २० लाख रुपये अनुदान देऊन मराठी ग्रंथ संग्रहालयात डिजिटलअभ्यासिका हा महत्त्वकांशी प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पा अंतर्गत शासनाने १० संगणक, १ प्रिंटर, १ प्रोजेक्टर, १ मोठी स्क्रीन, फर्निचर मध्ये टेबल खुर्ष्या, संगणकाला लागणारा बॅटरी बैकअप आणि आणि इंटरनेट सुविधा तसेच CCTV कॅमेरा दिलेला आहे. मराठी ग्रंथ संग्रहालयाने वाचकांची भविष्यातील गरज ओळखून ग्रंथालयाच्या दोन्ही शाखेमध्ये या प्रकल्पासाठी जागा दिली आहे. याठिकाणी खालील सेवा उपलब्ध आहेत:
• स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी ई-पुस्तके - १०००
• ६० भाषांमध्ये ई-वर्तमानपत्रे - Metzger Database
• ६० भाषांमध्ये ई-मासिके - Metzger Database
• ६० भाषांमध्ये ई-जर्नल्स
तसेथ तिथे नविन आलेली स्पर्धा परीक्षेची इ पुस्तके, देश विदेशातील इ-वर्तमान पत्रे यांची माहिती आणि इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या मोफत ई-संसाधनांच्या प्रकल्पांवर माहितीपर व्याख्यान ग्रंथालयाच्या नौपाडा शाखा येथे दर शनिवारी आयोजित करण्यात येतात. ग्रंथालयाने असे व्याख्यान अधिकाधिक विषयांवर घेण्याचे ठरवले असून तरुण वाचकांना वाचनाकडे आकर्षित करेल असे वाचन साहित्य देण्याचे प्रयत्न केले आहे.
KOHA Software द्वारे वापरकर्ते आता त्यांच्या मोबाईलवरूनही ग्रंथालयीन संग्रह पाहू शकतात.
तसेच पुस्तकाबद्दल वा स्वतःचा अभिप्राय ही नोंदवू शकतात. Opac.granthyan.com
ग्रंथालयाच्या सर्व नवीनतम updates आणि मोफत ई- संसाधनांच्या लिंक्ससाठी, तसेच १२००० डिजिटाइज्ड पुस्तकांच्या वाचनासाठी ग्रंथालयाने खालील संकेतस्थळ तयार केले आहे. www.granthyan.com
डिजिटल लायब्ररी मध्ये:
"3D printer" ही उपलब्ध आहे, या तंत्रज्ञानाने विद्यार्थी, व्यावसायिक यांना सर्जनशीलता, नवीनता तसेच नवकल्पनांना व्यासपीठ मिळेल. ज्याच्या वापराबद्दल वेळोवेळी व्याख्याने घेतली जातील.